Monday, December 27, 2010

माझी ग्रेट भेट ०४-०१-२००९ पुरंदरे वाडा -पुणे

छ्त्रपतींचे तुषारने पेपर कटिंगच्या माध्यमातुन तयार केलेले चित्रबाबासाहेबांना भेट देण्यास यासारखी दुसरी गोष्ट असू शकत नाही

काहि काही माणसे एखादे इश्वरी कार्य पुर्णत्वास नेण्यास जन्माला येतात .माननिय बाबासाहेब पुरंदरे  पण अश्या व्यक्तींपैकीच एक्.......महाराष्ट्राच्या या सुपुत्राने छत्रपतींचा रोमहर्षक इतिहास.शिवचरित्र रुपाने ..उभ्या महाराष्ट्राला  वाचताना पहायला शिकवला ..त्यांचे शिवरायांवरचे कुठलेही व्याख्यान ऐकताना अथवा लिखाण वाचताना आपण प्रत्यक्षात   शिवकालातच वावरत आहोत् असे वाटत राहते.......या अत्यंत आदरणीय व्यक्तीची प्रत्येक्ष भेट घेण्याची संधी मला दुसरुन मिळाली होती ती केवळ सुभाषकाकांमुळेच याआधी १९९३ साली आमच्या शाळेच्या दशकपुर्ती महोत्सवाच्या निमित्ताने  शाळेत त्यांच्या उत्स्फुर्त व ओजस्वी व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता.आजही तो दिवस आठवतोय महाराजांच्या शाहिस्तेखानाच्या स्वारीवर त्यांचे व्याख्यान  होते आणि ते ऐकताना मी इतकी रमले होते की जणू आपण प्रत्यक्ष त्या मोहिमेते महाराजांबरोबर लढलो आहोत अश्या प्रकारचा एक निर्मळ आनंद सतत मनात बाळगत राहिले...बाबासाहेबांना जेंव्हा जेंव्हा बघते तेंव्हा मनात अनेक प्रश्नांचे काहुर माजते .....बाबासाहेब नक्कीच शिवरायांच्या त्या इतिहासाचे एक खंदे आसामी असावेत? छत्रपतींच्या घरातल्यांपैकीच कुणीतरी? .निदानपक्षी  बाबासाहेब छत्रपतींच्या विश्वासातल्या सरदारांपैकीच कुणी तरि एक पुर्वजन्मी असतिल का?....बाबासाहेबांच्या स्मरणशक्तीला सलाम ....शिवचरित्र खर्‍या अर्थाने जगणार्‍या बाबासाहेबांना मानाच मुजरा....त्यांची प्रत्यक्षात घेतलेली भेट मला सतत जगण्याची उमेद देत राहते ....
तुषार बाबासाहेबांच्या चरणांशी




तुषारने  शिवराज्याभिषेकाचे पेपर कटिंगसच्या मदतीने साकारले दृष्य